आजपासून अँड्रॉइड मोबाईल फोन मधील सर्व ‘कॉल रेकॉर्डिंग’ ऍप ‘बंद’, मात्र तरीही फोनमध्ये ‘कॉल रेकॉर्डिंग’ करता येणार! ते कसे हे जाणून घ्या

मुंबई :

आज 11 मे पासून गुगल प्ले स्टोअर ने नियमावलीमध्ये बदल करत सर्व कॉल रेकॉर्डिंग ऍप बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्मार्ट फोनवरील कॉल रेकॉर्डिंग ऍप चा कोणताही उपयोग होणार नसून सर्व कॉल रेकॉर्डिंग ऍप बंद करण्यात येणार आहेत.
हा काय प्रकार आहे हे आता थोडक्यात समजून घेऊ या, अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग ऍप बंद होणार म्हणजे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ऍप च्या माध्यमातून आता अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. याचे स्पष्टीकरण देताना
गुगल म्हणते की, हा एक सुरक्षेचा भाग असून सुरक्षेमुळे कॉल रेकॉर्डिंग ऍप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्यावेळी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऍप डाउनलोड करता त्यावेळी हे ऍप अनेक परवानग्या घेत असतात ज्याचा अनेकवेळा गैर फायदा घेतला जात असल्याचे गुगलच्या लक्षात आले. त्यातच प्रत्येक देशात कॉल रेकॉर्डिंग ऍप साठी वेगवेगळा कायदा आहे त्यामुळे गुगलच्या नवीन नियमावलीनुसार आजपासून कॉल रेकॉर्डिंग ऍप पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.

पण तरीही कॉल रेकॉर्डिंग होणार ते कसे हे जाणून घ्या…
गुगलने कॉल रेकॉर्डिंग ऍप जरी बंद केले तरी ज्या स्मार्ट फोनमध्ये कंपनीने दिलेले इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग ऍप आहेत ते कार्यरत राहणार आहेत त्यामुळे ज्या फोनमध्ये आधीच कॉल रेकॉर्डिंग सिस्टम आहे ते काम करत राहणार आहेत. त्यामुळे ज्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फंक्शन आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही.