आंतरराष्ट्रीय
रशिया युक्रेन भिषण युद्ध (Russia Ukraine war) सुरु असतानाच आता इराणच्या (Iran six city attack) सहा शहरांवर एकामागून एक असे मोठे हल्ले झाले आहेत. त्यामुळे आता तिसरे विश्वयुद्ध (World War Three) भडकते कि काय अशी भीती केली जात आहे.
इराणवर करण्यात आलेले हे हल्ले नेमके कुणी केले याचा तपास केला जात असून अजूनतरी हे हल्ले इतर कोणत्या देशाने केले कि अतेरिकी संघटनेने याबाबत माहिती समजू शकले नाही. इराणच्या ज्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले त्यामध्ये कारज, इस्फहान, हमादान ख्वोय, आजर, डेजफूल अश्या या शहरांचा समावेश असून यात ड्रोनचाही वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
इराणच्या इस्फहान शहराला अनन्य साधारण असे महत्व असून या ठिकाणी इराणची लष्करी सामग्री आणि त्यांचे ड्रोन तसेच युद्धात वापरले जाणारे मिसाईल तयार करण्याचे कारखाने आहेत. इस्फहान च्या लष्करी तळावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला असल्याने यात वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात येत आहेत. इराण इस्राईलची असलेली दुश्मनी, रशिया-युक्रेन युद्धात इराणने रशिया दिलेले ड्रोन तसेच सौदी अरब बरोबर असलेली त्याचे पारंपारिक दुष्मनी हे सर्व पैलू इराणकडून तपासले जात आहेत.
या सर्वात जास्त शक्यता इराण-इस्राईलची असलेली दुश्मनी आणि त्यातून सुरु होणारे युद्ध याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. इस्राईलचा या हल्ल्यात हात असेल तर मात्र इराण शांत न राहता त्यास प्रत्युत्तर दिले जाईल आणि यातून तिसऱ्या विश्वयुद्धाला सुरुवात होऊ शकते याची भीती व्यक्त केली जात आहे. असल्याची या हल्यांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या पुढील कारवाईवर लागले आहे.