2 वर्षांसाठी तडीपार असणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

पुणे : ज्या विभागातून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते तेथेच आदेश मोडून फिरत असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उप आयुक्त साो. परिमंडळ ५, पुणे शहर यांचेकडील तडीपार आदेश
क्रमांक २२/२०२१ महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ५५ अन्वये सराईत गुन्हेगार सौरभ
गोविंद इंगळे (वय २२ वर्षे, रा.इराणी गल्ली, इराणी मशिद जवळ पठारे वस्ती,
कदमवाकवस्ती ता.हवेली जि. पुणे) याच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तो लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडील
रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे सदर गुन्हेगारास दिनांक २५/०८/२०२१ रोजी पासून २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी -चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केलेले होते.

मात्र तडीपार असतानाही सदर इसमाने पोलीस उप आयुक्त सो. परिमंडळ ५, पुणे शहर यांची कोणतीही पुर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश करुन त्यांचे आदेशाचा भंग करीत लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या बाजार मैदान येथे फिरत आहे अशी माहिती पोलीस अंमलदार राजेश दराडे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना कळविले असता त्यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अमित गोरे व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. वरील पथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास लोणीकाळभोर गावच्या हद्दीतून बाजार मैदान येथे पाठलाग करुन ताब्यात घेत त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त,
पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, नम्रता पाटील पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५,
बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी,वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि गोरे यांचे सोबत पोहवा / ३७९२ होले, पोलीस शिपाई/९९५६ दराडे, महीला पोशि/७६४४ फणसे यांच्या पथकाने केली आहे.