Categories: Previos News

‛या’ कारणामुळे दरोडेखोरांनी केला API लांडे आणि पुणे ग्रामिणच्या पोलीस अधिकाऱ्यांवर गोळीबार



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना फलटण जवळ घडली आहे.

या दरोडेखोरांनी सुमारे दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या वेशात येऊन सराफाच्या दुकानावर गोळीबार करत ते लुटले होते. दोन महिन्यानंतर या दरोडेखोरांचा आज सुगावा लागला होता. त्यामुळे त्या दरोडेखोरांना पकडण्यास पोलीस गेल्याने या दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलिसांच्या वेशात येऊन सराफाच्या दुकानावर गोळीबार केला होता. यातील आरोपी हे फलटण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने  आज पोलीस त्यांचा पाठलाग करताना फलटण जवळ वडले गावात वडगाव निंबाळकरचे एपीआय लांडे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले. मात्र त्याचवेळी दोन दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत ऊसाच्या शेतातून पसार झाले आहेत.

हि घटना समजल्यानंतर पोलीस दलासह नागरिकांमध्येही मोठी खळबळ माजली होती. नेमके काय झाले?? कुणी गोळीबार केला ?? का केला असेल ?? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

याबाबत आता खुद्द पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले सर्व पोलिस पथक सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही. फरार आरोपींचा शोध पुणे ग्रामीण आणि फलटण पोलीस घेत आहेत.अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

15 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago