पुरंदर : वाघापूर (ता.पुरंदर) पंचक्रोशीतील एक आदर्श व्यक्तिमत्व व ज्येष्ठ मार्गदर्शक कै.चांगदेव रामभाऊ कुंजीर यांचे दिनांक 31-10-2022 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित दुःखद निधन झाले.
कै.चांगदेव उर्फ बापू यांच्या बद्दल अधिक सांगावयाचे झाले तर बापूंना अपघाती अपंगत्व आले होते परंतु त्या अपंगत्वाचा गैरफायदा किंवा गैरलाभ न घेता त्या अपंगत्वावर मात करून एक आदर्श व्यक्तिमत्व,एक आदर्श उद्योजक, एक आदर्श पिता, भाऊ व एक आदर्श मार्गदर्शक म्हणून त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सार्थक केले.
अशी होती बापू यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
बाप्पूंची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता बापूंचे वडील कै. रामभाऊ किसन कुंजीर हे एक आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेले. भाऊ हे वाघापूर गावचे गाव कारभारी होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाघापूर गावाच्या विकासासाठी वाहिले. पुरंदर तालुक्यातील नामांकित पुरंदर शिक्षक प्रसारक मंडळाचे ते पंचवीस वर्षे उपाध्यक्ष होते. भाऊंना एकूण नऊ अपत्य त्यापैकी पाच मुली व चार मुले असा मोठा परिवार असलेल्या कुटुंबामध्ये कै.बापूंचा जन्म झाला होता.
कैलासवासी बापूंना दोन मुले असून दोन्ही मुले अतिशय उत्कृष्ट प्रकारे शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात एक नामावंत कारकीर्द गाजवीत आहेत. बापूंचे जेष्ठ चिरंजीव श्री. विजय कुंजीर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक आदर्श शिक्षक तसेच एक नामवंत बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे द्वितीय चिरंजीव श्री.नितीन हे एक वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय संसाधनाचा तसेच औषधांचा मोठा होलसेल व्यापार करीत आहेत.
त्याचप्रमाणे बाप्पू हे वाघापूर ग्रामपंचायत चे माजी ग्रामपंचायत सदस्य असून बापूंचे जेष्ठ बंधू कै. काळूराम हे भारतीय रेल्वे खात्यात नोकरीस होते. तसेच दोन नंबरचे कनिष्ठ बंधू कै.गोपीनाथ हे पोलीस प्रशासनात कार्यरत होते. त्याचप्रमाणे वाघापूर गावचे उपसरपंच श्री.अशोक रामभाऊ कुंजीर हे बापूंचे सर्वात लहान धाकटे बंधू आहेत. केसनंद गावचे आदर्श सरपंच श्री हिरामण शेठ माणिकराव हरगुडे हे बापूंच्या लहान बहिणीचे चिरंजीव आहेत.
अश्या या आदर्श व्यतिमत्व असणाऱ्या बापूंचे 31/10/2022 रोजी निधन झाले असून दशक्रिया विधी दिनांक 06/11/2022 रोजी वाघापूर (ता.पुरंदर जि.पुणे) येथे होणार आहे.