|सहकारनामा|
पुणे / दौंड : अब्बास शेख
मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी आज केडगाव येथे स्वप्निल लोणकर या आत्महत्या केलेल्या युुवकाच्या कुटूंबियांची भेट घेत आर्थिक मदत जाहीर केली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना हे सरकार झोपले आहे का! आत्महत्या केल्यानंतरच मदत जाहीर करणार का असा सवाल उपस्थित करत
महाराष्ट्र सरकार मधील 2 लाख पद रिक्त आहे, मात्र तरी हे सरकार झोपले आहे, असं काही पाऊल उचलल्या नंतर सरकार जागे होणार आहे का? असा परखड सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
मूळचा केडगाव ता. दौंड येथील असणाऱ्या स्वप्नील लोणकर swapnil lonkar या युवकाने MPSC परीक्षा पास होऊनही पोस्टिंग न मिळाल्याने आत्महत्या केली होती. स्वप्नील च्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी सरकारच्या धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. आणि आमचा मुलगा हा पोस्टिंग न मिळाल्यानेच डिप्रेशन मध्ये गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले होते.
आज अमित राज ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांची भेट घेत त्यांना मोठी आर्थिक मदत जाहीर केली यावेळी त्यांच्या सोबत मनसे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, राजेंद्र वागजकर हे उपस्थित होते.