Categories: Previos News

america attack, 9/11 चा अमेरिकेवरील तो सुन्न करणारा भयानक हल्ला.. आणि अमेरिकेची सूड उगवल्यानंतर बदलेली धोरणे



|सहकारनामा|

पुणे : (अब्बास शेख)

9/11 च्या हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन आणि पेनसिल्व्हेनियावर हल्ला करून अमेरिकेसह जगालाही मोठा धक्का देत आम्ही कोठेही आणि काहीही करू शकतो असा जणू संदेशच दिला होता. त्यावेळी अमेरिकेने याचा सूड उगवत अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांना आश्रय देणारे प्रांत बेचिराख केले होते, मात्र आता पुन्हा अमेरिकेने आपली धोरणे बदलत जेथे मोठ्या प्रमाणावर कारवाई केली तेथे त्याच लोकांशी बातचीत करून नरमाईची भूमिका घेतली आहे, हे मात्र जगातील अनेक देशांना पटलेले नाही.

अमेरिकेवर 9/11/2001 ला झाला होता सर्वात मोठा दहशतवादी हल्ला..

अमेरिकेवर हल्ला करणे म्हणजे आपल्या हाताने आपला सर्वनाश करणे हे संपूर्ण जग जाणून होते. तरीही 9/11 ला दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवर्सवर दोन विमानांचा मिसाईल सारखा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात तेथे काम करत असलेल्या विविध देशांतील अनेक लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या दहशतवाद्यांनी एकूण चार विमानांचे अपहरण केले होते पैकी तिसऱ्या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला तर चौथे विमान पेनसिल्व्हेनिया येथे कोसळले होते.  

या हल्ल्यामध्ये एकूण 2996 लोक मरण पावले होते तर 6,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश त्यावेळी एका शालेय कामात व्यस्त असताना त्यांचे तत्कालीन प्रेस सचिव एरी फ्लेशर यांनी बुश यांना या हल्ल्याबाबत माहिती दिली होती. हल्ल्याची माहिती बुश यांना मिळाल्यानंतर त्यांना दुःख तर होत होतेच शिवाय कुणी अशी दानत कशी करू शकते याचा धक्काही बसला होता. यावेळी बुश यांनी या हल्ल्यामागे असणाऱ्या प्रत्येकाला शोधण्याचा दृढनिश्चय करून त्यांच्यावर अचूक प्रहार करण्याची आपली योजना पूर्णत्वास नेत अगोदर अफगाणिस्तानात असणाऱ्या अल कायदाच्या ठिकाणांवर हल्ले चढवले, यावेळी येथे तालिबानचे राज्य होते ते हल्ल्यांमध्ये नेस्तनाबूद झाले. ओसामा बिन लादेन त्याची अल कायदा संघटना आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येकाला यावेळी अमेरिकेने वेचून वेचून ठार केले. मात्र तरीही या हल्ल्यामागिल मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन हा सापडत नव्हता. त्यावेळी त्याची अल कायदा संघटना संपविण्यासाठी सज्ज होताना बुश यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी यांना सांगितले होते की ‘आम्ही युद्धभूमीवर आहोत, यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल’. अल कायदा संघटनेचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड  होता हे अमेरिकेने जाणून त्याचा शोध सुरू केला होता.

असा झाला ओसामा चा अंत..

ओसामा बिन लादेन  तब्बल 10 वर्षांनी अमेरिकन कमांडोंच्या हाती लागला तो पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे. अमेरिकन सैनिकांनी त्याला ठार करण्याची जी व्यूहरचना आखली होती ती सक्सेस झाली होती आणि ओसामाला ठार करण्यात त्यांना अखेर यश आले होते. अमेरिकेवर झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेने सुरक्षा धोरणात व्यापक बदल केले. आजही  अमेरिकेवरील दहशतवाद्यांचा धोका कमी झालेला नाही असे त्यांच्या सुरक्षा यंत्रणांना वाटते. 

मात्र अमेरिकेने आता आपली काही धोरणे बदलून कमीत कमी शत्रू  ठेवण्याचा विचार केलेला दिसत आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा तालिबान नेत्यांशी बातचीत ने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि याची सुरुवात करताना त्यांनी अफगाणिस्तान मधील आपले सैन्य माघारी बोलवून सपशेल तेथील सत्ता पुन्हा नव्या तालिबान च्या हातात दिली आहे. हे सर्व होत असताना आता जर पुन्हा अमेरिकेवर एखादा हल्ला झाला तर त्यास सर्वस्वी अमेरिकेची मवाळ झालेली धोरणेच जबाबदार असतील असे अनेक देशांना वाटत आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago