महिला वकिलांच्या ‘या’ युक्तिवादामुळे कलाकेंद्र गोळीबार प्रकरणातील आरोपिंना 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला-वाखारी येथे असणाऱ्या अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार केल्या प्रकरणी यातील आरोपिंना यवत पोलिसांनी अटक केल्यानंतर आज दि. 24 जुलै रोजी आरोपींना दौंड येथील न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील चैताली शोभित भोसले यांनी जोरदार युक्तिवाद केल्याने या आरोपिंना 28 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारी वकील चैताली शोभित भोसले यांनी सरकारची बाजू मांडत, शस्त्र परवाना हा बचावसाठी दिला जातो, नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यासाठी परवाना दिला जात नाही आणि गोळीबार करण्यासाठी परवाना दिला जात नाही. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे महिला गोळीबारत जखमी असल्याचे प्रसार माध्यमात आल्याने सखोल तपास होणे आवश्यक आहे असा युक्तिवाद केला.

यावेळी त्यांनी, आरोपीच्या कृत्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, सामाजिक अस्थिरता निर्माण झाल्याने आरोपींना पोलिस कस्टडी द्यावी अशी जोरदार मागणी लावून धरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेता दौंड येथिल मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बडगुजर कोर्ट यांनी आरोपीस 28 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.