अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड व्हाट्सअप ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड, व्हाट्सअप ग्रुप च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त महासंघाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असलेले अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी सोशल मीडियाच्या वापराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

कोंढरे म्हणाले की ,सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे ,पण योग्य वापर केलात तर आपली ,आपल्या परिवाराची ,आपल्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. जगातील कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असते. काय चांगले, काय वाईट याचे विश्लेषण करता आले पाहिजे. तसेच आपला अमूल्य वेळ यासाठी किती खर्च केला पाहिजे याचे भान हवे.

दौंड तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ या व्हाट्सअप ग्रुपला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दौंड येथील हॉटेल प्राईम स्क्वेअर येथे एक आगळावेगळा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कायम समाजउपयोगी माहिती उपलब्ध करून दिली जाते.याचा उपयोग समाजातील महिला ,विद्यार्थी ,व्यवसायिकांना होत असतो.

यावेळी आमदार राहुल कुल, मा.आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे , शशांक मोहिते ,उल्हास मिसाळ ,गुलाबदादा गायकवाड ,दत्तात्रय सावंत यांनीही मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी संभाजी माने, राकेश गायकवाड, रवि पवार तसेच समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. नुकतेच प्रशासकीय सेवेत व सी.ए.परीक्षेत पास झालेल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

प्रास्ताविक शहराध्यक्ष शैलेश पवार यांनी केले ,सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष प्रताप खानवीलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदू जगताप,विक्रम पवार, गणेश घोलप,आदिनाथ थोरात,निखिल सावंत, उमेश वीर,प्रसाद गायकवाड, संजय थोरात, सोमनाथ लवंगे,रोहन घोरपडे, विकास जगदाळे, गणेश काकडे, शंतनु निंबाळकर, प्रमोद पवार, वैभव जठार, राकेश भोसले, दादा मोरे,सीमा दिवेकर, राणी जांबले, सज्जन काकडे,अभिषेक गायकवाड, योगेश कराळे,राहुल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले,