‘सहा’ महिने नव्हे तर ‘पाच’ वर्षांसाठी अजितदादांना ‘मुख्यमंत्री’ पद, मात्र ! देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राजकीय

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी चे सरकार कोसळून shinde-फडणवीस यांचे युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडी घडून अजितदादा हे युती सरकारमध्ये सामिल झाले आणि युतीचे सरकार महायुती सरकार म्हणून उदयास आले. हे सर्व होत असताना अजित पवार हे मुख्यमंत्री मंत्री होतील असा कयास सर्वत्र लावला जाऊ लागला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

अजितदादा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजितदादा यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना, अजितदादा सहा महिन्यांसाठी नव्हे तर पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील मात्र सध्यातरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि या सरकारच्या काळात तेच मुख्यमंत्री म्हणून सरकारचा कार्यकाल पूर्ण करतील असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे या सरकारच्या काळात अजितदादा मुख्यमंत्री होतील हे कार्यकर्त्यांचे स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नसल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर महायुतीसोबत एकत्र निवडणूक लढून मगच येणाऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदी वर्णी लागेल असा काहीसा फॉर्मुला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तर खा. सुप्रिया सुळे यांच्या अडचणी वाढणार… येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती सरकार कश्या पद्धतीने जागा वाटप करते आणि बारामती विभागात कोण उभे राहते यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. बारामती विभागात महायुतीचा उमेदवार उभा राहिल्यास खा. सुप्रिया सुळे यांच्या अडचणी वाढणार आहेत. यावर लवकरच सविस्तर वृत्त प्रसिद्ध करणार आहोत.