अब्बास शेख
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निकालानंतर थोरात गटाला आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या थोरात गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे थोरात गटात अस्वस्थता निर्माण होत चालली आहे. आगामी निवडणुकांअगोदरच तालुक्यात घडत असलेल्या विविध राजकीय घडामोडिंमुळे दौंडचे राजकारण तापू लागले आहे.
मागील महिन्यात केडगाव येथील गरदडे, सूळ यांसह हंडाळवाडीच्या थोरात गटातील कट्टर कार्यकर्त्यांनी कुल यांच्या माध्यमातून भाजमध्ये प्रवेश केला होता. हे सर्व कार्यकर्ते माजी आमदार रमेश थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत थोरात यांना मानणाऱ्या समर्थक आणि सदस्यांनी छुप्या पद्धतीने कुल गटाला मदत केली होती. याचा परिणाम म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या 20 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या थोरात गटाला यावेळी या बाजार समितीच्या सत्तेपासून रोखण्यात कुल गटाला यश आले.
तर त्यानंतर तालुक्यातील अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांनीही ‘थोरात’ गटाला सोडून ‘कुल’ गटात जाणे सुरूच ठेवले असून याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या एकीचा अभाव आणि त्यांना विश्वासात घेऊन काम केले जात नसल्याचा त्यांनी केलेला आरोप हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. तर आमदार राहुल कुल मात्र प्रत्येक कार्यकर्त्याला वयक्तिकरित्या विश्वासात घेऊन त्यांची कामे करत असल्याचे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असल्याचे हे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळातही थोरात गटाला मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील नागेश्वर विका. सोसायटीच्या संचालक आणि कार्यकर्त्यांनी कुल यांच्या माध्यमातून भाजमध्ये प्रवेश केला असून काल हिंगणीबेर्डी – काळेवाडी परिसरातील , मुंबई हायकोर्टचे वकील महेश पहाणे, विनोद भोसले, सुरेश भोसले, अमोल कामठे, अमोल भोसले, विशाल कामठे, गौतम काळे, गोरख गोधडे यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आ. कुल यांनी त्यां सर्वांचे स्वागत करत हिंगणीबेर्डी – काळेवाडी गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भीमा पाटसचे संचालक तुकाराम अवचर, भाजपचे जिल्हा चिटणीस गोरख गाढवे, मुरलीधर नाना भोसले, भाजपा पुणे जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य संजय पहाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार राहुल कुल यांच्यावर विश्वास ठेवून अनेक थोरात समर्थक, राष्ट्रवादी चे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असून यामुळे थोरात गटात मात्र अवस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.