Breaking |चौंडी येथील धनगर समाजाचे उपोषण मागे, अब ‘बारामती’ दूर नही… ‘भाजप’ बारामतीसह इतरही जागा जिंकणार – गिरीश महाजन

चौंडी/बारामती : चौंडी येथे 21 दिवसांपासून सुरु असलेले धनगर समाजाचे उपोषण आज समाप्त करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले असून यावेळी सरकारकडून धनगर आरक्षणबाबत समिती गठीत करून त्यातून मार्ग काढण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी जाहीर केले.

बारामती आमच्यासाठी दूर नाही-गिरीश महाजन

चौंडी येथे जात असताना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, बारामतीसह राज्यातील इतर जागाही भाजप मित्रपक्षांच्या सहाय्याने सहज जिंकेल असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते चौंडी येथे धनगर समाजाकडून सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गिरीश निघाले असताना त्यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना, मित्रपक्षांसह राज्यात लोकसभेसाठी निर्विवाद यश प्राप्त करेल, विरोधक या निवडणुकीत क्लिन बोल्ड होतील असे म्हणत, यावेळी आमच्यासोबत अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार आहेत.अजितदादा पवार आमच्यासोबत असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपण खरे बोलतो, कधी खोटे बोलत नाही असे म्हणत बारामतीच्या काहींना आपल्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही पण राज्यातील इतर जागांसह बारामतीची जागाही भाजप जिंकणार असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सुप्रिया सुळे यांची टीका – भाजप आणि राज्यसरकारवर टीका करताना खासदार सुळे म्हणाल्या की, भाजपवाल्यांना पक्ष, घर फोडणे इतके काम असून सीबीआय, इडीमध्ये ते इतके मग्न आहेत की, त्यांना विकास करायला वेळच नसतो हेही मान्य करायला हवे अशी टीका खा. सुळे यांनी केली. तसेच नागपूरमध्ये संतप्त लोकांनी फडणवीस यांची गाडी अडवली, यावर प्रश्‍न विचारला असता त्या म्हणाल्या की, एक लोकप्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणीही गाडी अडवून जाब विचारुन त्यांच्याकडे न्याय मागितला पाहिजे मात्र त्यांना त्रास दिला जाऊ नये असे त्या म्हणाल्या.