अख्तर काझी

दौंड : महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच निवड झाली असून यामध्ये ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांची उपाध्यक्षपदी तर ॲड. अमोल काळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
ॲड. मुलाणी आणि ॲड. काळे हे दोघेही सन २०२५ मध्ये नोटरी म्हणून नियुक्त झाले होते. त्यांच्या या पूर्वीच्या कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून असोसिएशनने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील नोटरींच्या कामामध्ये अधिक समन्वय आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्याने नोटरी म्हणून कार्यरत झालेल्या या वकिलांना संघटनेत महत्त्वाची पदे मिळाल्याने नोटरी असोसिएशनच्या कार्यात युवा नेतृत्वाची भर पडली आहे. ॲड. मुलाणी आणि ॲड. काळे यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यातील वकील आणि नोटरी समुदायाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







