पुणे : पुणे ग्रामीणमध्ये विविध ठिकाणी चोऱ्यांमध्ये सामील असणारी टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना शिरूर पोलीसांनी जेरबंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१/०८/२०२२ रोजी रात्री ११:०० वा. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी शिरूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऑलआऊट ऑपरेशन करीता वेगवेगळी पथके तयार करून रात्रगस्त करत होते. त्यावेळी दिनांक ०१/०८/२०२२ रोजी पहाटे ०४:३० वाजण्याच्या सुमारास नांद्रेमळा येथील कानिफनाथ मंदीराच्या भिंतीच्या आडोशाला काही इसम संशयास्पद
रित्या उभे असलेले पोलीस पथकास दिसले. पोलिसांनी तेथे अचानक छापा टाकला असता त्यामध्ये चारजण मिळून आले.
पकडलेल्या इसमांमध्ये १) किसन रामा लोंखडे, (वय २२ वर्षे, रा.आरोळे हॉस्पीटल शेजारी जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) २) अशोक उर्फ सोनु
बबन जाधव, (वय २३ वर्षे) ३) रूषीकेश बाळासो गरडकर, (वय २३ वर्षे)
४) रवि रमेश नाईक, (वय २० वर्षे, रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक खाकी रंगाची बुलेट विना नंबर प्लेटची (चॅसी नं. ME3U3S5C2KG596655) एक लोंखडी पहार, एक कुऱ्हाड, एक स्प्रे पेंन्ट, दोन मिरची पावडरच्या पुड्या, एक रस्सी, एक ओपो कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १ लाख ५१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चौघांना या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे मिळुन आलेली हत्यारे व साधनावरून सदरचे इसम हे कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची खात्री झाल्याने सदर आरोपी यांच्याविरूध्द शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं ५४५ / २२ भा.द.वि. कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिंना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक ०३/०८/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत असुन तपासामध्ये आरोपी यांचेकडे मिळुन आलेली एक खाकी रंगाची बुलेट विना नंबर प्लेटची तीचा (चॅसी नं. ME3U3S5C2KG596655) ही त्यांनी कासुर्डी टोलनाका येथुन चोरली असल्याचे निष्पन्न झाले तर आरोपी यांनी दिनांक ०१/०८/२०२२ रोजी रात्री राहु ता. दौंड, जि. पुणे येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला असून आरोपी रवि रमेश नाईक हा यवत पोलीस ठाणे येथील सन २०२१ मधील एटीएम फोडीच्या गुन्हयामधुन आज पर्यंत फरारी होता. सदर आरोपी यांनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता असुन त्या दृष्टीने शिरूर पोलीस त्यांचेकडे
तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख, (पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण) मितेश घट्टे, (अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) यशवंत गवारी (उपविभागीय
पोलीस अधीकारी, शिरूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलीस ठाणे, सपोनि अमोल पन्हाळकर, सहा. फौजदार राजेंद्र साबळे, पोना नितीन सुद्रिक, पोकॉ. योगेश गुंड, होमगार्ड सुहास आडगळे, राहुल चौगुले, पोलीस मित्र अक्षय काळे यांनी
केली आहे.