यवत (दौंड) : भावाला राखी बांधायला आलेल्या बहिणीचा घरी परतत असताना अपघाती मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. वैशाली नितीन शेंडगे (वय 26, रा. हडपसर मंतरवाडी ता हवेली जि पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक कोपनर डेअरीजवळ ता दौंड जि पुणे) यांनी फिर्याद दिली असून वाहन चालक मोहन रावसाहेब डोंबे (रा.खोर, डोंबेवाडी, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण सौ. वैशाली ही रक्षाबंधन करीता आली होती. तीला तिचे भाऊ मोटारसायकलवर बसवुन बोरीभडक चंदनवाडी येथे जात असताना हाॅटेल जयभवानी समोर पाठीमागुन भरदाव वेगाने सफारी गाडी एम एच 42 झेड 4147 हीने त्या दोघांना पाठीमागुन जोरात धडक दिली , त्यात सौ. वैशाली शेंडगे यांना सफारी गाडीने फरफटत ओढत घेऊन गेली त्यामुळे फिर्यादी यांची बहीन वैशाली हीच्या डोक्याला, हातापायाला गंभीर मार लागल्याने ती जागीच बेशुद्ध पडली.
त्यानंतर तिला तेथील लोकांनी ॲम्बुलन्स बोलावून सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऍडमिट केले तेथे उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला आहे. सौ. वैशाली यांचा अंत्यविधी नायगाव, तालुका पुरंदर येथे करण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.