Accident | पुणे सोलापूर महामार्गावरील भांडगाव जवळ प्रवासी बस उलटली, 12 जखमी

दौंड : दौंड तालुक्यातील भांडगावजवळ पुणे सोलापूर महामार्गावर एक प्रवासी ट्रॅव्हल बस उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 12 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमिंना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही प्रवासी ट्रॅव्हल बस मुबंईवरून तेलंगनाला जात होती. पुणे सोलापूर महामार्गाने जात असताना भांडगाव जवळ या बसला एक दुचाकीस्वार आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ही बस उलटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटना घडल्यानंतर यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलिस फौजफाट्यासह लगेच घटनास्थळी पोहचून पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी लोकांना त्वरित बस च्या बाहेर काढले त्यामुळे जीवित हानी झाली नाही. अधिक वृत्त थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत.