दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगांव (ता.दौंड) येथील झोपडी हाॅटेल समोर दि.24 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता बस पलटी होऊन भिषण अपघात घडला होता. या अपघातामध्ये अनेकजण किरकोळ, गंभीर जखमी झाले होते. यातील 10 जखमिंची ओळख पटली असून हयगईने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजित प्रल्हाद इंगवले (वय 31 वर्षे व्यवसाय – नोकरी, पोलीस नाईक, यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बस ड्रायव्हर हनुमंत जाधव (रा.नायगांव ता.नायगांव जि.नांदेड) हा सोलापुर हायवे रोडवर, खाजगी लक्झरी बस नं. PY 01 CS 2552 ही हयगईने, अविचाराने, रहदारीचे, नियमांकडे, दुर्लक्ष करून भरधाव वेगात पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे चालवित घेवुन जात असताना त्याच्यासमोर एक मोटार सायकल आलेने त्याने त्याच्या लक्झरी बसचा अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळे त्याचा लक्झरी बस वरील ताबा सुटल्याने लक्झरी बस ही डांबरी रोडवर पलटी होवुन अपघात घडला.
यावेळी बस मधील 1) राहुल गंगाधर तरटे (रा.नर्सीगरोड नांदेड) 2) कु.नेहारीका नागनाथ हांडे, 3) शंकुतला दिंगबर वाळके, 4) कु.साक्षी नागनाथ हांडे तिंन्ही (रा.देहु आळंदी पुणे) 5) विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि.धाराधीव) 6) पुष्पराज हनुमंतराव पाटील (रा.गुरूनिवास श्रीनगर नरसिंगरोड ता.मुखेड जि.नांदेड) 7) ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद) 8) सौ.माणिकेम मुतीराज जकाला 9) मुनीराज मुताबा जकाला (दोंन्ही रा.तळोजा काॅम्पलेक्स मुंबई) 10) सौ.सुलोचना कृष्णा रेडडी (रा.उपरमाल्याना ता.गंगाधरा जि.करीमनगर) हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.
बस चालक हनुमंत जाधव हा अपघाताची खबर न देता निघुन गेला. या अपघात प्रकरणी बस चालकावर भा.द.वि.क. 279, 337, 338, मो.व्हे.अॅ.184,134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मदने करीत आहेत.