|सहकारनामा|
दौंड : दौंड हुन काष्टी कडे जात असलेल्या दुचाकीचा रस्ता दुभाजकाला धडकून अपघात झाला.
अपघातामध्ये दौंडचा एक युवक गंभीर जखमी झाला असून इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. महेश सांगळे (सिद्धार्थ नगर, दौंड ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून हनुमंत भालेकर व बाळू लोणकर हे बोरावके नगर येथील युवक किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत येथील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमजद शेख यांनी दिलेली माहिती अशी, एकाच दुचाकीवर(MH-45,V 0952) हे तिघे दौंड हुन काष्टी कडे जात होते, दौंड- काष्टी रस्त्यावरील लोखंडे मळा परिसरातील रस्त्यावरील गटारीच्या चेंबरच्या वर आलेल्या झाकणाला यांची दुचाकी धडकली त्यामुळे दुचाकी चालविणाऱ्याचा दुचाकी वरील ताबा सुटला व दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली.
डोक्यास गंभीर दुखापत झालेल्या युवकास उपचारासाठी पुण्याला पाठविले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.