पुणे ग्रामीण : यवत परीसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून एका आठवड्यात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील
आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास सूचनेप्रमाणे करत असताना
पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याबाबत
आरोपीला पकडण्यासाठी व्यूहरचना आखली होती.
त्याप्रमाणे यवत पोलीस स्टेशन हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक मदतीने माहिती मिळाली की
, यवत पो.स्टे गु र नंबर 882/2022 भादवी क 380 मधील संशयित इसम हा बोरी फाटा येथे येणार असल्या
चे समजले.
सदर पथकाने माहिती
च्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव यश भारत शिंदे
(वय 19 वर्षे,रा. शिंदवणे,ता, हवेली,जि. पुणे
) असे सांगितले. त्याच्याकडे
वरील गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करून तो वापरत असलेल्या मोबाईलची पाहणी केली असता तो वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल असल्याची खात्री
झाली. त्यामुळे सदर पथकाने त्या
च्याकडे अधीक तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
वरील आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी
त्याला यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात
देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उप निरीक्षक सिद पाटील, पो.हवा.सचिन घाडगे, पो.हवा.अजित भुजबळ, पो.हवा.विजय कांचन, पो.हवा.अजय घुले, पो.ना.धिरज जाधव यांनी केली आहे.