अख्तर काझी
दौंड : दौंड शहरामध्ये 74 वा संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या वतीने संविधान प्रचार, प्रसार, जनजागृती, संविधान व्याख्यान, संविधान शाहिरी,जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी दौंड शहरातील शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. शुक्रवार (ता.२४) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओव्हळ यांचा भारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. शनिवार (ता.२५) आम्ही भारताचे लोक मोहीम, युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा, मुंबई, सादरकर्ते संविधान प्रेमी आकाश पवार व ऐश्वर्या पवार आणि सहकारी यांचा ‘हमारा संविधान है’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
रविवार (ता.२६) रोजी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान स्तंभास मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, मा. सभापती आप्पासाहेब पवार, मा.नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे पाटील, मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, मा. नगराध्यक्ष नंदु पवार, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी सोहेल खान, तुषार थोरात, गुरुमुख नारंग, उत्तम सोनवणे, जयदीप बगाडे, नागेश साळवे, राजु सोनवणे, नंदु बनसोडे, नंदु जगताप, शैलेश पवार, बाबा पवार, अश्विन वाघमारे, विनायक माने, अभिजीत शिंदे, विलास शितोळे, सचिन कुलथे, आनंद बगाडे, मतीन शेख, राजाभाऊ कदम, सागर उबाळे, राजेश मंथने, भारत सरोदे, प्रमोद राणेरजपुत, फिलीप धुमाळ, उत्तम आटोळे, राजेंद्र खटी,भीमराव मोरे, ज्ञानेश्वर मजगर, बी.वाय.जगताप, मोकाशी सर, शामसुंदर सोनोने, महादेव कवडे, गुलाब जमादार, आशा मोहिते, अनिता लोंढे, साधना सोनोने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार, यादव जाधव यांनी केले. संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन संविधान स्तंभ संवर्धन समितीचे अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केले.