राष्ट्रीय हरित सेनेने गोकुळ वृद्धाश्रमाची दिवाळी केली गोड

अख्तर काझी

दौंड : शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पर्यावरणपूरक फटाके विरहीत सामाजिक जाणिवांची दिवाळी बाबत केलेल्या आवाहनास अनुसरून विद्यार्थी, सेवक वृंद आणि संस्था पदाधिकारी यांनी फटाके विरहीत दिवाळी साजरी करून आधार कलशात 33 हजारांपेक्षा जास्त आधार निधी संकलित केला.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फटाके विरहीत सामाजिक जाणिवांची दिवाळी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. यावेळी फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया व संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी फटाक्याचे दुष्परिणाम व सामाजिक जाणिवांची दिवाळी या उपक्रमाबाबत प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी या आवाहनास प्रतिसाद देत आपापल्या परिसरातील नागरिकांना याबाबतचे प्रबोधन करून आधार निधी आधार कलशात संकलित केला.

या उपक्रमाचे हे सलग १६ वे वर्ष आहे, याच आधार निधीतून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळी पाडव्याला दौंड मधील अनाथालयात जावून तेथील बालकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. यावेळी भिमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, उपमुख्याध्यापक तथा राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे, पर्यवेक्षक नवनाथ कदम उमेश पलंगे, उपशिक्षक चंद्रवदन गाढवे ,रामदास होले, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी कुशल बोरा, सिद्धेश कसबे, ईशा ओसवाल, स्टेला यम्मार आदीच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिरूर येथील खिवराज राजमल मुथा चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे मोफत चालवण्यात येणाऱ्या गोकुळ वृद्धाश्रमातील वृद्धांना १२०००/- रुपये किमतीचा किराणा व मेडिकल किट चे वाटप करण्यात आले. आधार निधी संकलनातून प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी मधील प्रातिनिधिक 11 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर व बुटाचे वाटप भिमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण बिडवे, संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, अध्यक्ष गोविंद अगरवाल व संस्था पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

उर्वरित गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर व बुटाचे वाटप करण्यात येणार आहे. आधार निधी संकलनासाठी व हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, स्व.कि.गु.कटारिया महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष समुद्र, प्रशालेचे उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, उपमुख्याध्यापक तथा राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे, पर्यवेक्षक नवनाथ कदम, उमेश पलंगे, प्रशालेचे उपशिक्षक चंद्रवदन गाढवे, श्रीकृष्ण ननवरे, श्रीकृष्ण भुजबळ, रामदास होले, रामदास मखरे, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी कुशल बोरा, ईशा ओसवाल, सिद्धेश कसबे, स्टेला यम्मार, असद शेख, शारदा रेड्डी, सोफिया शेख तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी व सेवकांचे सहकार्य लाभले.