अख्तर काझी
दौंड : भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव, मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचा 79 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. भीमथडी शिक्षण संस्था, नागरिक हित संरक्षण मंडळ, आमदार राहुल कुल मित्र मंडळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), कि. गु. कटारिया पतपेढी तसेच अजहर सय्यद मित्र मंडळाच्या वतीने शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार राहुल कुल, मा. आमदार रंजना कुल, भीमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बिडवे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष रवि कंद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, सुदर्शन चौधरी, गोविंद अग्रवाल, नंदू पवार, हरिओम उद्योग समूहाचे राजेश पाटील तसेच शहर व तालुक्यातील विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रेमसुख कटारिया यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अजहर सय्यद मित्र मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर, रुग्णांना फळ वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत 80 रक्तदाता मित्रांनी रक्तदान केले. अकबर सय्यद, अजहर सय्यद, गणेश आल्हाट, गणीभाई सय्यद ,राजू जाधव ,रोहिन शेख, याकूब जगले यांनी या ठिकाणी नियोजन केले.
आमदार राहुल कुल मित्र मंडळ, नागरिक हित संरक्षण मंडळ, आरपीआय आघाडीच्यावतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले. मा.आमदार श्रीमती रंजनाताई कुल, रवींद्र कांबळे, मा. नगराध्यक्ष शितल कटारिया, अंकुशा शिंदे, आकांक्षा काळे,मा. नगरसेविका संगीता बनसोडे, वीर, आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री जाधव, इंदुमती जगदाळे यांच्या हस्ते साडीवाटप करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भेट स्वीकारली. मा. नगरसेवक राजू बारवकर, प्रकाश भालेराव, ऍड अमोल काळे, फारुख कुरेशी ,फरहान कुरेशी, रतन जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रेमसुख कटारिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड चांगले ,स्वच्छ, सुंदर व्हावे तसेच येथील नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही शेठजींच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळेच लोकांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत. म्हणूनच शेठजी या वयातही आरोग्य सांभाळून लोकांची सेवा करीत आहेत. आपण चांगले काम करतो म्हणून परमेश्वर सुद्धा आमच्या पाठीशी आहे हे आम्ही प्रत्येक निवडणुकीच्या निकाला दरम्यान अनुभवले आहे. लोकांच्या आशीर्वादाबरोबर परमेश्वराचे सुद्धा आशीर्वाद असणे गरजेचे असते. जनतेची सरळपणे दिवसरात्र सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून कधी कधी आम्ही निवडणूक हारणे सुद्धा परमेश्वराला मान्य नसते. त्यामुळे आपण लोकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेत राहावे. शेठजींनी या शहरामध्ये काम करत असताना येथील सगळ्या कुटुंबीयांशी अतिशय प्रेमाचे संबंध निर्माण केले आहेत.
आणि हे करत असताना दौंड कसे असावे हे त्यांनी आम्हाला ज्या ज्या वेळेस सांगितले ते ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शेठजींच्या माध्यमातून शहरामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यांनी सुरू केलेली जागर व्याख्यानमाला देश पातळीवरची दर्जेदार व्याख्यानमाला या परिसरात होते. दौंड रेल्वे जंक्शन म्हणून जसे ओळखले जाते, तितकीच ताकदिची जागर व्याख्यानमाला त्यांचे सहकारी आयोजित करत असतात. दौंडच्या सांस्कृतिक वाटचालीत अतिशय महत्त्वाची असणारी व मनोरंजना पासून प्रबोधनापर्यंतची ही व्याख्यानमाला पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे शेठजींनी वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केले आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. शेठजींचे वय 79 वर्ष पूर्ण होत असताना, त्यांनी त्याचे शतक साजरे करावे आणि त्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना उपस्थित राहण्याचा योग यावा अशा प्रकारच्या सदिच्छा मी सर्व दौंडकरांकडून देतो असेही राहूल कुल म्हणाले.