नितीन काळे
खडकी (दौंड) : जालन्यातील अंतरावली सराटी येथिल मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठचार्जच्या निषेधार्थ आज खडकी गाव बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी मराठा समाज बांधवांकडून खडकी ग्रामपंचायत, भैरवनाथ मंदिर मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत खडकीतिल मोर्चा काढण्यात आला होता.
या निषेध मोर्चामध्ये गावातील युवक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अश्या प्रकारच्या घोषणा दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सचिन काळभोर, खडकी गावचे माजी उपसरपंच राहुल गुनवरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश नवले, आरक्षण अभ्यासक तसेच ज्येष्ठ समासेवक पांडुरंग मेरगळ या सर्वांनी मनोगते व्यक्त करून शासनाचा निषेध केला.
यावेळी दत्तात्रय शितोळे, अनिल गुणवरे, रामदास कुदळे, अमोल काळे,शब्बीर पठाण, दिलीप शितोळे, काका काळभोर, निलेश शितोळे, बापुसाहेब सकुंडे, विजय टाकळे, राहुल काळे, गणेश काकडे, प्रणाल शितोळे, शिवाजी जाधव, दादा आरेकर, प्रशांत शितोळे, माऊली काळभोर, हनुमंत काळभोर, नितीन काळे, बाळासाहेब दरेकर, दत्तात्रय शितोळे, नंदू काळे, रामभाऊ भोसले, पोलिस पाटील संदीप काळे, सुरेश देवके, स्वप्नील शिंदे, प्रवीण काळे तसेच खडकी गावातील सर्व तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदित्य मोहिते यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रमोद काळे यांनी मानले.