अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव येथून चोरट्यांच्या टोळीने जेसीबी मशीनचा ब्रेकर व इतर साहित्य चोरून नेले होते, याप्रकरणी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी विजय बबन गायकवाड (रा. वडकी, ता. हवेली, पुणे) यांनी दौंड पोलिसांकडे तक्रार केली होती.
पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेकडून सदर चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक अविनाश शीळीमकर यांनी यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाल्याने या पथकाने दि. 2 सप्टेंबर रोजी भिगवन परिसरामध्ये सापळा रचून आरोपींना शिताफिने अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यातील जेसीबी मशीन, ट्रॅक्टर असा एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच निहाल असलम मुलानी, रोहित दुरांडे, निलेश कुसाळकर व जालिंदर दादा जाधव (सर्व रा.भिगवन) या आरोपींना ताब्यात घेऊन दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले
सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीणचे पो. अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पो. अधीक्षक मितेश घट्टे, दौंड चे उपविभागीय पो. अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक अविनाश शीळीमकर, सहा. पो. निरीक्षक राहुल गावडे, पो. हवा. सचिन घाडगे ,आसिफ शेख, विजय कांचन ,अतुल डेरे तसेच सहा. फौ. राजपुरे व दौंड पोलीस स्टेशनचे महेंद्र लोहार, सुभाष राऊत, किशोर वाघ या पथकाने केली आहे.