फोर्स लोड शेडींगमुळे देऊळगाव राजे येथील नागरिक, शेतकरी त्रस्त

राहुल अवचर

देऊळगावराजे : फोर्स लोड शेडींगमुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी त्रस्त होऊ लागले आहेत. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे आज दुपारपासून अचानक झालेल्या फोर्स लोड शेडिंगमुळे या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

दुपारपासून फोर्स लोड शेडिंग थ्री फेजला चालू झाले होते त्यानंतर सायंकाळी सहाच्या आसपास सिंगल फेज ला लोड शेडिंग चालू झाले असून रात्रीच्या नऊ वाजले तरी हे लोड शेडिंग संपले नव्हते. अचानक झालेल्या लोड शेडींगमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लोड शेडींगची अगोदर कुठलीही कल्पना न दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


फोर्स लोड शेडिंगचा मेसेज हा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून येत असून त्यांचा मेसेज आल्यानंतर लोड शेडिंग करण्यात येत आहे. तर परत मेसेज आल्यानंतर विज सुरळीत करण्यात येत असून यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही अशी माहिती वायरमन नितीन मेंगावडे यांनी दिली आहे. तर हे फोर्स लोड शेडिंग दुपारी करण्यात यावे संध्याकाळी लोड शेडिंग करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाबू पासलकर यांनी केली आहे.