दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC मध्ये असणाऱ्या होनर लॅबरोटरी लि. येथील डी ब्लॉक मधील मटेरियल स्टोरेज रूममध्ये दरोडा टाकून सुमारे 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. याबाबत नितीन कैलास थिटे (रा.घारगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर सध्या रा.दत्तनगर गोपाळवाडी दत्त दिंगबर अपार्टमेंन्ट) यांनी फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी दिनांक 23/08/2023 रोजी रात्री 10.00 च्या सुमारास होनर लॅबरोटरी लि. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे. येथील डी ब्लॉक मधील मटेरियल स्टोरेज रूम मधील 5 लाख 40 हजार रुपये किंमतीची एम.एन.एस 2 (मॉन्टीलूकास्ट सोडीयम) पावडर दरोडा टाकून चोरी केली. त्यानंतर ते ती पावडर घेवून जात असताना फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडले असता आरोपींनी फिर्यादीला छाती, पोटात बुक्कयांनी मारहाण केली व हातातील लाकडी काठीने जखमी केले. यापूर्वीही कंपनीच्या, डी ब्लाँक मधील मटेरियल स्टोरेज रूप मधून एम. एन. एस 2 ( मॉन्टीलूकास्ट सोडीयम) 31 किलो वजनाची पावडर चोरी झाली होती त्याचीही चोरी या चोरट्यांनी केली असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.
या प्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी 1) संतोष योगेंद्रनाथ मिश्रा (रा. साउथ कॉलनी साहेबगंज तहसिल साहेबगंज रा.झारखंड सध्या रा. भोंगळेवस्ती कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे), 2) पवनकुमार चिकरमाराम भारती (रा. गाजीपुर तहसिल मरमदाबाद राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे). 3) जितेंद्रकुमार गोपीनाथ तुरी (रा. पहारपुर, पोस्ट दुर्गापुर तहसिल तीनपहाड जि.साहेबगंज राज्य झारखंड), 4) विजयकुमार मोतीमंडल (रा. विजयनगर इथारी, ता. बरीयापुर जि. मुंगेर राज्य बिहार. सध्या रा. कुरकुंभ शेवाळे प्लॉट ता. दौंड जि. पुणे). 5) राजकुमार वित्तरदिन पुष्पाकर (वैध्द रेसिडेन्सी राजपिपला रोड अंकलेश्वर गोखल भरूच, राज्य गुजरात सध्या रा. शेवाळे प्लॉट कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) यांना अटक केली आहे.