अख्तर काझी
दौंड : आपणही समाजाचे काही देणे लागतो हे सामाजिक भान समोर ठेवून कनी महिला मंच च्या वतीने येथील जनता प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
पुण्याच्या कल्याणी उल्हास कदम यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दौंड कनी महिला मंच च्या अध्यक्षा मधु टाटिया, मनीषा सोनटक्के, मा. नगरसेविका आकांक्षा काळे ,लीना जोसेफ, वनिता सरागे ,उर्मिला भुमकर तसेच जनता एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा छाया थोरात, दीपक वाघमारे या मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सागर गावडे, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळावे व त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून आपण सर्वांनीच त्यांच्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे असे छाया थोरात यावेळी म्हणाल्या. उपक्रमाबाबत थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाडगे यांनी व सूत्रसंचालन सुद्रिक यांनी केले.