सहकारनामा ब्यूरो
मावळ (पुणे) : मावळ येथील गहुंजे येथे सासरवाडीला गेलेल्या सुरज काळभोर यांचा यांचा अज्ञातांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सूरज काळभोर हे गहुंजे येथे त्यांचे सासरे संतोष बोडके यांच्याकडे सासरवाडीला गेले होते. आज रविवारी सकाळी ते शेतीमध्ये फेरफटका मारायला गेले असता त्यांच्यावर काहीजणांनी कोयत्याने हल्ला चढवत सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्याने सुरज काळभोर हे जागीच कोसळले. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा तपास सुरू केला आहे.
मात्र सूरज काळभोर यांचा खून कोणी आणि का केला याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. वरील घटना ही चोरीच्या उद्देशाने घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असली तरी केवळ लुटमार करण्यासाठी इतका भयानक हल्ला करून कोणी खून करेल का याबाबत शंका उपस्थित केली जात असून यामध्ये अजून काही वेगळे कारण आहे का याचाही अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.