Odisha Train Accident | मृतांचा आकडा पोहोचला 288 वर तर जखमिंची संख्या 900, 3 रेल्वे एक-दुसऱ्याला धडकल्या

ओडिशा : ओडिशा च्या बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वेमध्ये झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले आहेत.
हा अपघात 2 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला असल्याचे सांगण्यात येत असून कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, आणि एक मालगाडी असा तीन रेल्वे गाड्यांमध्ये हा अपघात घडला आहे.

दोन रेल्वेगाड्या एका रुळावरून धावल्याने हा अपघात घडल्याचे काही माध्यमांकडून सांगितले जात आहे. तर एक्सप्रेसचे डबे रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसला तिची जोरदार धडक बसली त्याचवेळी बाजूने मालगाडी जात असल्याने या दोन्ही गाड्यांचे डबे त्या मालगाडीलाही धडकले आणि या अपघाताची भीषणता वाढत गेली असेही म्हटले जात आहे.

या अपघातात आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एन डी आर एफ च्या तुकड्या तसेच हवाई दलाकडूनही बचावकार्य सुरू आहे.