Love Jihad issue : लव जिहाद नव्हे “या” मुळे राज्यातील अनेक महिला, मुली झाल्या गायब

मुंबई : राज्यातून अनेक महिला,मुली गायब झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती आता याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यातून महिला, मुली गायब होण्याचे कारण लव जिहाद (Love Jihad) नसून मानवी तस्करी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातून अनेक महिला,मुली गायब होण्याचं कारण लव जिहाद असल्याचा प्रचार केला जात होता मात्र कोरोना नंतर नोकरीच्या आमिषाला बळी पडून अनेक महिला, मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात घरातील कर्त्या पुरुषांचे किंवा आई,वडिलांचे निधन झाल्याने अनेक महिला,मुली नोकरी, व्यवसायाच्या शोधात बाहेर पडल्या आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडून त्या एजेंटांच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये गेल्या. तेथे गेल्यानंतर अगोदर त्यांचे मोबाईल, पासपोर्ट काढून घेण्यात आले अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना दिली.

राज्यातून महिला,मुली गायब होण्यामागे लव जिहाद असून यामुळे राज्यातील तसेच विविध प्रांतातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लव जिहादमध्ये अडकवले जात असल्याचा प्रचार काहींनी सुरू केला होता त्याला आता रुपाली चाकणकर यांच्या उत्तराने कुठेतरी चपराक बसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन काळात आणि कोरोना काळात अनेक, महिला मुली नोकरीच्या आमिषाला बळी पडून आखाती देशात गेल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.