दौंड : केडगाव (ता.दौंड) येथील दैनिक पुढारीचे पत्रकार दीपक देशमुख यांच्या मातोश्री कै.सौ.रंजना हरिभाऊ देशमुख यांचे आज दि.29 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै.सौ.रंजना देशमुख यांच्यामागे पती हरिभाऊ, मुलगा दीपक, दुसरा मुलगा ॲड. किरण तसेच मुलगी सौ.कविता जगताप आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. रंजना देशमुख ह्या माई या नावाने परीसरात परिचित होत्या. अतिशय शांत, प्रेमाने बोलणे आणि प्रत्येकाची आदराने विचारपूस करणे हा त्यांचा स्वभाव होता.
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यविधीला पुणे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, दै.पुढारीचे विभागीय संपादक सुहास जगताप तसेच दौंड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.