‘सहकारनामा’चा ‘तृतीय’ वर्धापनदिन उत्साहात साजरा, मान्यवरांच्या हस्ते भव्य ‘वृक्षारोपण’ संपन्न

दौंड : संपूर्ण पुणे जिल्ह्यात अल्पावधित जनतेच्या पसंतीस उतरलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘सहकारनामा’ (sahkarnama) या वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलचा ‘तृतीय’ वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाला दौंडचे मा.आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंड तालुका राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आवर्जून भेट देत कार्यक्रमस्थळी वृक्षारोपण केले. केडगाव (देशमुख मळा माळ) येथे हे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, शिसम, कडूनिंब, चेरी, अशी साधारण 8 ते 10 फूट उंचीची 30 झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

यावेळी मा.आमदार रमेश थोरात यांनी ‘सहकारनामा’ वृत्तपत्राच्या निर्भीड लिखाण आणि सामाजिक उपक्रमांची स्तुती केली. आप्पासाहेब पवार यांनी सहकारनामा च्या कुठल्याही घटनेच्या त्वरित येणाऱ्या बातम्यांची माहिती देताना तालुका आणि जिल्ह्यातील कोणतीही घटना घडली कि ती अगोदर सहकारनामा ला वाचायला मिळते असे मत व्यक्त करतानाच दौंड तालुक्यातून सहकारनामा सारखे वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टल उदयास आले याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले.


वैशाली नागवडे यांनी सहकारनामा च्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना, सहकारनामा प्रत्येकवर्षी नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे म्हणत वृक्षारोपण हि काळाची गरज असल्याचे म्हटले.
यावेळी रामभाऊ टुले,दिलीप हंडाळ,संजय गरदडे,सचिन शेळके,धोंडिबा शेळके,एक वृक्ष एक मित्रचे प्रशांत मुत्था,नाना (तेजस)टेंगले, पत्रकार अलिम सय्यद,ज्ञानदेव जगताप,अजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

तर कार्यक्रमाला मा.सभापती झुंबर गायकवाड,न्यू अंबिकाचे अशोकबाबा जाधव, हार्मोनि कंपनीचे मॅनेजर तथा पत्रकार दीपक चौधरी,उद्योगपती राजेंद्र मलभारे,सचिन काळभोर,अजित शितोळे,ग्राप सादस्य मनोज शेळके,नितीन जगताप,धोंडिबा शेळके,विठ्ठल शेळके,भानुदास देशमुख,भानुदास शिंदे,राजेंद्र शेळके,शहर पोलीस दत्तात्रय गायकवाड,दत्तात्रय कडू,संभाजी ताकवणे,पोपट शेंडगे,किशोर शर्मा,

सकट,समीर शेख,राज शेख,मजीद शेख,अजीज शेख,फकीर पठाण (पारगाव),रफीक शिकिलकर,सचिन काळभोर,मनोज भोसले (होळकर),रफीक शिकिलकर,धनाजी शेळके,संभाजी ताकवणे,दत्ता हंडाळ,भापकर गुरुजी,हनुमंत जगताप,निलेश कुंभार,भगवान गायकवाड,कुमार जगताप,सुभाष काकडे, संतोष गजरमल,प्रथमेश गायकवाड इत्यादी मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

तर पत्रकार बांधवांमध्ये सकाळ चे जेष्ठ पत्रकार रमेश वत्रे,लोकमतचे प्रकाश शेलार,दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुण्यनगरीचे प्रशांत वाबळे,लोकशाही न्यूज चॅनेलचे विनोद गायकवाड,सहकारनामा चे उपसंपादक अख्तर काझी, जनप्रवास चे अलिम सय्यद, लोक सह्याद्री चे बापू निखळे, प्रभात चे राहुल अवचर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.


हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्यवस्थापन समितीचे इसाक शेख,लतीफ खान,संतोष देशमुख,फकीर पठाण,मुबारक पठाण,रज्जाक इनामदार,असिफ शेख,बशिर खान,फारूख इनामदार,सोहेल पठाण,निसार पठाण,मुन्ना सय्यद,समीर पठाण,तन्वीर पठाण,साहिल पठाण, झियान शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.