दौंड : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या माध्यमातून, संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने दौंड शहरामध्ये लोकशाहीचा करुनी गजर लोकशाहीचा करूया जागर हे पथनाट्य सादर करीत संविधानाचा प्रसार व जनजागृती करण्यात आली.
पथनाट्याचे दिग्दर्शक प्रकाश वाघमारे व त्यांच्या सहकलाकारांनी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये पथनाट्य सादर केले. पथनाट्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सोहेल खान, इंद्रजीत जगदाळे, वैशाली धगाटे, प्रणोती चलवादी, सचिन गायकवाड, नरेश डाळिंबे, अजय राऊत, जाकीर शेख आदी उपस्थित होते.
संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या माध्यमातून यावर्षीही दौंड शहर व तालुक्यात संविधानाचा प्रसार ,प्रचार ,जनजागृती ,चित्ररथ ,माहितीपत्रकाद्वारे करण्यात येणार आहे. उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून त्याची सांगता 26 नोव्हेंबर रोजी होणार असून शालेय विद्यार्थ्यांसह सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी सांगितले.