दौंड : दौंड शहरातील गोल राऊंड येथे मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद – निपाणी बस अडवून बसवर जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारच्या सीमावाद प्रश्नी असलेल्या भूमिकेचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत निषेध केला.
थोडा वेळ बस अडवल्यानंतर बसमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी चहापाणी देऊन बस पुढील प्रवासासाठी रवाना केली.
महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सह कुठलाही भाग महाराष्ट्र पासून तोडू दिला जाणार नाही, सीमावाद प्रश्न हा न्यायालयीन प्रक्रियेत असताना घटनात्मक पदावर बसलेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेजबाबदार विधाने करू नयेत असे मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी सांगितले.
यावेळी १९८६ साली कर्नाटक -महाराष्ट्र सीमावाद आंदोलनात भाग घेतलेल्या दौंड मधील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह विक्रम पवार, दादासो नांदखेले, आदिनाथ थोरात, शैलेश पवार, अविनाश गाठे ,विकास जगदाळे, विनय लोटके ,रोहन घोरपडे, गणेश घोलप ,शंतनु निंबाळकर, वैभव जठार, अमित पवार, योगेश कराळे, राकेश भोसले ,बापू घोरपडे, जालिंदर जाधव, राजू माने आदि समाज बांधव उपस्थित होते.