दौंड : दौंड नगरपालिका व जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाल अंत्योदय योजना- नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत दौंड मधील युवक व युवतींसाठी उद्योग कर्ज मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यास येथील युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक खलील हवालदार यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती बाबत उपस्थित युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. ज्यांचे प्रकल्प अहवाल व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली आहे त्यांचे ऑनलाइन पोर्टल भरून घेण्यात आले.
दौंड नगरपालिकेचे कर निर्धारण अधिकारी तृप्ती साळुंखे व हनुमंत गुंड तसेच मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले बँकेचे अधिकारी निरंजन साळुंखे, विजय मोरे, श्रेयश ठाकूर, देबदास महापात्रा तसेच बाळकृष्ण तारे, दिलावर शेख, सविता भोर व काझी ट्रेनिंग सेंटरच्या अंजुम काझी यांचे मेळाव्यास सहकार्य लाभले.