डॉ. रिता मदनलाल शेटीया यांची ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद, महिला रक्त दातीच्या कार्याने पुण्याचा गौरव वाढला

पुणे

आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी’ च्या ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुण्यातील डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची “ग्लोबल रेकॉर्ड ऑफ मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ब्लड डोनर”, 2022 (Global record of most inspiring woman blood donar) म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या अगोदर शेटीया यांना २०१५ मध्ये “रक्त दाता” हा पुरस्कार रोहिणी जाधव ट्रस्ट, दौंड, यांच्या वतीने निवृत्त आयएएस अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. नुकतीच शेटीया यांची आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी’ च्या राजदूत पदी नियुक्ती झाली आहे.

शेटीया यांनी आता पर्यंत १८ वेळा रक्त दान केले असून त्या रक्तदानाविषयी जनजागृती करून आणि सार्वजनिक मोहिमेद्वारे लोकांना रक्त दानाचा एक भाग होण्यासाठी प्रेरित करतात.

त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून रिता शेटीया यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.