दौंड : दौंड येथे मंजूर असलेल्या वरिष्ठ न्यायालयासाठी अर्थ खात्याकडून निधी मिळावा या मागणीसाठी दौंड प्रॅक्टिशनर लॉयर्स असोसिएशन चे पदाधिकारी यांनी आमदार राहुल कुल यांची भेट घेतली व सदर कामासाठी निधी लवकर प्राप्त होण्यासाठी आमदार कूल यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. शशिकांत गायकवाड, उपाध्यक्ष ऍड. अमोल काळे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. अजित बलदोटा, ऍड.अझरुद्दीन मुलानी तसेच मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया उपस्थित होते.
दौंड येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय व्हावे अशीही मागणी वकील संघटने कडून यावेळी करण्यात आली. वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे यावे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन सदरचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. वरिष्ठ न्यायालय व स्वतंत्र प्रांत कार्यालय दौंड येथे व्हावे यासाठी आमदार कुल यांनी उत्तम रीतीने पाठपुरावा केला याबद्दल वकील संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील कुरकुंभ मोरी ते गोल राऊंड रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संपन्न झाला. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती, छोटे मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती त्यामुळे आमदार कुल यांनी या रस्त्यासाठी आवश्यक निधी प्राप्त करून दिला व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.मा. नगराध्यक्ष शितल कटारिया, योगेश कटारिया तसेच मा.नगरसेवक, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.