|सहकारनामा|
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे येथे असलेल्या हजरात ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा सुप्रसिद्ध उरूस कोविड प्रसाराच्या अनुषंगाने रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज दि. ता. २४ जूूून रोजी ख्वाजा शाहमन्सूर दर्गा सभामंडपात उरुसाविषयी विश्वस्त व ग्रामस्थ यांची बैठक झाली त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
रविवार ता. २७/०६/२०२१ ते बुधवार ता. ३०/०६/२०२१ या दिवशी सुपा गावचे ग्रामदैवत व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा उरूस येत आहे. परंतू कोरोना प्रादुर्भावामुळे व शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळे बंद असल्याने यंदाचा उरुस रद्द करण्यात आला असून फक्त धार्मिक विधी, विश्वस्त, मानकरी, फकीर, धर्मगुरू व भाविकांच्या मोजक्याच उपस्थितीत प्रशासनाच्या आदेशानुसार केले जातील अशी माहिती शाहमन्सूर दर्गा कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूसभाई कोतवाल यांनी दिली.
या बैठकीला अध्यक्ष म्हणून पी.एस.आय शेख, पोलीस कर्मचारी शेंडगे, ताडगे, तसेच बी. के. हिरवे, शौकतभाई कोतवाल, दादा पाटील कुतवळ, अनील हिरवे, काका कुतवळ, संजयमामा दरेकर, मल्हारी आप्पा खैरे, राघूआप्पा हिरवे, दत्ता पन्हाळे, सुशांत जगताप, तुषार हिरवे, ज्योतीताई जाधव, अतुल ढम , पिंटू मोगल, वसिम तांबोळी, जाकीर शेख, सत्तार शेख, महंमद हाशम शेख तसेच दर्गा कमेटीचे विश्वस्त अमीनुद्दीन मुजावर, समीर डफेदार, अयूब शेख व ग्रामस्थ उपस्थित होते