मुंबई : काही वर्षांपूर्वी अनिल कपूर याचा नायक हा चित्रपट आला होता. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे पात्र रेखाटताना त्यामध्ये विविध प्रोटोकॉल आणि व्ही आय पी ट्रीटमेंट मुख्यमंत्री नाकारून लोकांच्या अडी अडचणींकडे जास्तीत जास्त लक्ष देताना दाखवले होते. असाच काहीसा प्रयोग सध्याच्या राज्यसरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राबवताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत.
ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.