देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर ‘स्ट्रोक’, राज्याचे नवे ‘मुख्यमंत्री’ एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात महावीकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा होता. या राजीनाम्यानंतर आज विरोधीपक्षनेते आणि भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक देत थेट एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली आणि राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे.
राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय असे म्हणत एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.” देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला.

शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वतः कुठलेखी खाते घेणार नाही, बाहेरून लक्ष देऊ – देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण या सरकारवर बाहेरून लक्ष देत राहू मात्र या मंत्रिमंडळात आपण नसू असे सुतोवाच त्यांनी काढले आणि नेहले पे देहला असा पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक त्यांनी दिला आहे.