पुणे : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी दौंड तालुक्यातील कानगावचे रहिवासी भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक 21 / 22 जून 2022 रोजी रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाची विस्तारित राज्य कार्यकारणी पणवेल मुंबई येथे झाली होती.
सदर कार्यकारणीमध्ये भानुदास शिंदे यांची सर्वानुमते रयत क्रांती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत हे रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
संस्थापक अध्यक्ष सागर खोत यांनी भानुदास शिंदे यांना निवडीचे पत्र दिले. भानुदास शिंदे हे 22 वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करत असून त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, सभा, निवडणुका, अधिवेशने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे कार्यकर्ते म्हणून भानुदास शिंदे यांना ओळखले जाते.
भविष्यामध्ये रयत क्रांती पक्षाची बांधणी राज्यभर करणे व या पक्षामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेणे व निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान मिळवणे याची जबाबदारी भानुदास शिंदे यांना देण्यात आली आहे.
रयत क्रांती पक्ष
कार्यकारणी
– प्रदेश अध्यक्ष
भानुदास शिंदे
– प्रदेश उपाध्यक्ष
शिरीषजी आनंदराव सोनावणे
– युवक आघाडी अध्यक्ष
विजय पाटील (पप्पू)
– पक्ष प्रवक्ते
दिपक भाऊ भोसले, प्रशांत ढोरे पाटील
– संपर्कप्रमुख
1) सुहास पाटील
(सांगली, कोल्हापूर)
2) सागर खोत
(पुणे, सातारा, कोल्हापूर)
3) दीपक भोसले
(बीड, उस्मानाबाद)
4) पांडुरंग शिंदे
(जालना, परभणी)
5) गजानन राजबिंडे
(लातूर, नांदेड)
6) शिवाजी पेठे आणि संगीता कोल्हे
(हिंगोली)
7) विलास बापू भदाणे
(जळगाव, नंदुरबार)
8) एन. डी. चौघुले सर
(सिंधुदुर्ग , रत्नागिरी)
9) बाबासाहेब पोटे
(धुळे, औरंगाबाद)
10) प्रशांत ढोरे पाटील
(वाशिम)
11) अजय बागल आणि गजानन गांडेकर
(अहमदनगर व नाशिक)
1२) जितुभाऊ अडेलकर
(अमरावती)
13) ॲड. आशिष वानखेडे
(बुलडाणा)
14) नाना पाटील
(अकोला)