शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात दौंड मध्ये निषेध मोर्चा, शिवसेना आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची.. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी- दौंड शिवसेनेचा निर्धार

दौंड : अख्तर काझी

शिवसेनेच्या (shivsena) मेहरबानीवर निवडून आलेल्या 55 पैकी 54 आमदार (Mla) जरी शिवसेना सोडून गेले तरी आम्ही शिवसेने सोबतच राहू कारण शिवसैनिकांमुळे नेते आहेत, नेत्यांमुळे शिवसेना (shivsena) नाही अशी भूमिका घेत दौंड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षाशी गद्दारी करून बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. (ShivSainiks became aggressive, staged a protest march)

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर,उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, शहर प्रमुख आनंद पळसे व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते. हातामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा घेत शिवसैनिकांनी हिंदुहृदय सम्राट बाळासो ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जय जयकार केला व पक्षाचे बंडखोर मंत्री, आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेनेच्या विरोधात बंड करणाऱ्या आमदारांबाबत बोलताना महेश पासलकर म्हणाले, शिवसेनेच्या विरोधात अनेक बंड झाले, परंतु त्यांना थंड करण्याचे काम निष्ठावंत शिवसैनिकांनी अनेक वेळा केलेले आहे. काही लोकांना ईडी, जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. काही मंत्र्यांना या अगोदरच जेलमध्ये टाकलेले आहे त्यामुळे नेमके कोण लोक असे करत आहेत हे सर्वांना माहित आहे. महाराष्ट्र मध्ये भाजपाचे नामोनिशाण नसताना राज्यातील हिंदू मतांचे विभाजन होऊ नये म्हणून बाळासाहेबांनी भाजपा पक्षाबरोबर युती केली व 25 वर्ष कोणताही धोका न देता इमानदारीने साथ दिली. ज्या झाडाची मुळे खोलवर गेलेली आहेत त्या झाडाला कधीही भीती नसते, पानगळती होऊ द्या, जे उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. या बंडाच्या निमित्ताने आज पासून आपण शिवसेनेची सुरुवात करतो आहे असे समजून यापुढे पक्षाचे काम करायचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे, शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेनेचा हा भगवा कधीही खाली पडणार नाही. असे किती आले आणि किती गेले शिवसेनेला काही फरक पडत नाही असेही पासलकर म्हणाले.

उपस्थित एकनिष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना अनिल सोनवणे म्हणाले की, शिवसेनेला 56 वर्षे पूर्ण झाली, या 56 वर्षात शिवसेनेवर अनेक संकटे आली.बंड शिवसेनेला नवीन नाही. ज्या कार्यकर्त्याला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही अशांना ठाकरे परिवाराने, शिवसेनेने मुख्यमंत्री पदा सारखी पदे बहाल केली, मात्र स्वतः बाळासो ठाकरे यांनी कोणतेही मोठे पद घेतले नाही. तसा पणच त्यांनी केलेला होता. परंतु राजकारणातल्या काही अपरिहार्य कारणामुळे 25 वर्षाची शिवसेना- भाजपा युती विश्वासघाताने तोडण्यात आली. त्याला जशास तसे उत्तर द्यावयाचे म्हणून कोणाला स्वप्नात वाटले नसेल अशी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांनी आघाडी केली. आणि आता ज्यांनी बंड पुकारले आहे त्यांना सांगितले होते की तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून. तिन्ही पक्षाची अपरिहार्यता म्हणून मा. शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे म्हणून गळ घातली आणि आघाडीचे सरकार स्थापन झाले.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विकास पूर्ण वाटचाल करत असताना या सरकारने अनेक संकटे पेलली. परंतु सत्तेसाठी पिपासलेली ही माणसे केंद्राकडून ईडी, सीबीआय चा दबाव आणतात आणि या भीतीपोटी शिवसेनेतील काही आमदार फुठून बाहेर पडले. शिवसैनिकांना विश्वास आहे बंडखोर आमदारांपैकी निम्मे आमदार पुन्हा शिवसेनेत येतील. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसैनिकांकडून वचन घेतले होते की मला इतक्या वर्ष सांभाळले त्याप्रमाणे उद्धव आणि आदित्य यांनाही सांभाळा. आणि आम्ही त्या वचनाला बांधील आहोत. शिवसेना आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची हे या बंडखोर आमदारांनी चांगलेच लक्षात ठेवावे.