दौंड : उस्मान अली शाब्दि उर्दू शाळेमधील विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी 1 ते 10 वी. मधील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जरीना काझी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके देण्यात आली.
तसेच प्रायमरी च्या मुख्याध्यापिका नाईकवाडी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन चौधरी यांनी केले व हन्नूरे सरांनी आभार मानले.