देहू येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील ‘या’ घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला – खा.सुप्रिया सुळे

पुणे : आज मंगळवारी पुण्यातील देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र बोलू दिले नाही हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांना बोलू दिले नसल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाल्याचे पहायला मिळाले.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते मात्र तसे न करता फक्त विरोधी पक्षनेत्यांना तेथे बोलू दिले आणि उपमुख्यमंत्र्यांना नाही हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

देहू येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचे मुंबई येथे आगमन होताच त्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मान्यवर

या कार्यक्रमाअगोदर श्री. संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,आमदार श्री. महेशदादा लांडगे यांचे समवेत उपस्थित होतो. महत्वाचे नेते आवर्जून उपस्थित होते.

देहू येथील कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले त्यावेळी आयएनएस शिक्रा येथे त्यांचे स्वागत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धवठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.