मुंबई : प्रश्न (अंगणवाडी इमारत)
प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या इमारती बांधकामासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात करत या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या जीवांशी खेळ नको अशी भावना विधानसभा सभागृहात सुरु असलेल्या तारांकित प्रश्नाच्या वेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, अंगणवाडी, बालवाडी प्राथमिक शाळा यामध्ये समजाची नवीन पिढी तयार होत असते परंतु या इमारतीच्या बाबत अतिशय गंभीर परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी लहान मुले मोडकळीस आलेल्या इमारतीत शिक्षण घेत आहेत त्यामुळे प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या इमारती बांधकामासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली.
आमदार राहुल कुल यांनी वरील प्रश्न उचलून धरल्यानंतर, महिला व बाल कल्याण विभागाला अर्थसंकल्पात निधी उपलब्ध झाला असून, प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या इमारती बांधकामासाठी शासन लवकरच कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.