Daund Shivsena – दौंड शिवसेनेच्या वतीने आमदार रवींद्र मिर्लेकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार



|सहकारनामा|

दौंड : साईबाबा संस्थान (शिर्डी)च्या उपाध्यक्षपदी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना दौंड विधानसभेच्या वतीने पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे व दौंड तालुका प्रमुख अनिल सोनवणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख अजित आटोळे, विधानसभा संघटक संतोष जगताप, तालुका उप प्रमुख सदाभाऊ लकडे, सर्जेराव म्हस्के, राजेंद्र मासाळ, चंदू भनभने, नामदेव राहिंज, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.