दौंड : दौंड शहर शिवसेनेचे शहरप्रमुख आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रथमच विवाह नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान, दौंड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षा कांताताई साळवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, नगरसेवक राजेश जाधव, जिवराज पवार, ज्योतीताई राऊत, मोहन नारंग, बबलु कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जगदाळे, प्रहार संघटनेचे रामेश्वर मंत्री, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रशांत पवार, युवक शहराध्यक्ष सचिन गायकवाड, बहुजन वंचितचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, मा. नगरसेवक फिलीप अँथोनी , युवा नेते अजय राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दौंड शहरातील बहुसंख्य नागरिकांनी कोरोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिबीराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवसेना दौंड शहर संघटक अजय कटारे, उपशहरप्रमुख प्रसाद कदम, युवाधिकारी चेतन लवांडे, एस एस इंटरप्रायझेसचे संदिप खंडाळे, ऋषिकेश पळसे तसेच संतोष पळसे, शिवाजी मोरे, विकास आहेर, निखिल पळसे, अपुर्व लेले, अवधूत वाळके, व्यंकटेश अकुल, विशाल शिंदे, किरण आनंद, गणेश झोजे, आकाश लवांडे, अर्जुन काळे, आशिष पळसे, जगदीश शितोळे, धनंजय वाडेकर तसेच अन्य शिवसैनिकांनी सहकार्य केले.