यवत येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम (ATM) दरोड्यात स्थानिकाचाच हात! पोलीसांनी केले 3 जणांना जेरबंद, 10 लाखाची रक्कम जप्त, युट्यूबवर ATM फोडण्याचे घेतले ट्रेनिंग…

पुणे / दौंड – यवत ता.दौंड येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे विशेष म्हणजे या टोळीत दौंड तालुक्यातीलच चोरट्याचा हात असल्याचे समोर आले आहे.
दिनांक १७/०१/२०२२ रोजी ०२-३० ते ०४.०० वा.चे दरम्यान मोजे यवत गावचे हद्दीतील पुणे सोलापूर हायवे लगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, यवत चे ए.टी.एम.मशीन गॅस कटरचे सहाय्याने फोडून व कापून ए.टी.एम.मशीनचे नुकसान करून त्यामधून एकुण रू. २३,८०,७००/- रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने
चोरून नेली होती. त्याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५९/२०२२, भा.दं.वि.कलम ३८०, ४२७ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री, अभिनव देशमुख साो., मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. मिलींद मोहिते सो. यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे
ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके व यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप
येळे, पोलीस उप निरीक्षक श्री. अमोल गोरे, श्री. रामेश्वर धोंडगे व यवत पो.स्टे.चे पो.स.ई.संजय नागरगोजे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील १) सहा.फोज. तुषार पंदारे, पोलीस हवालदार २) राजू मोमीन, ३) अजित भुजबळ, ४) आसिफ शेख, ५) अजय घुले, ६) प्रमोद नवले, ७) विजय कांचन, ८) चंद्रकांत जाधव, पोलीस नाईक ९) योगेश नागरगोजे, १०) मंगेश थिगळे, ११) अमोल शेडगे, १२) बाळासाहेब खडके, १३) प्रसन्ना घाडगे, चासफो. १४) मुकुंद कदम, म.पो.शि. १५) पुनम गुंड व यवत पो.स्टे. कडील पो.हवा. १६) गुरू गायकवाड १७) निलेश कदम, १८) मारूती बाराथे, १९) रामदास जगताप, २०) महेंद्र चांदणे यांच्या चार पथके तयार करून
तपासकामी रवाना केलेली होती, सदर गुन्हयाचे तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत पथकांना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा अजय रमेशराव शेंडे, (वय ३२ वर्षे, धंदा मजुरी, शिक्षण १२ वी, रा. सहजपुर, ता. दौंड, जि.
पुणे) याने त्याचे साथिदारांसह केलेला आहे. त्यावरून नमुद आरोपीस सहजपुर येथून आज दि. २०/०१/२०२२ रोजी ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथिदार शिवाजी उत्तम गरड, (वय २५ वर्षे, धंदा मजुरी, शिक्षण ८ , रा. करंजी, पो. लेहणी, ता. रिसोड, जि. वाशीम) ऋषीकेश
काकासाहेब किरतिके, (वय २२ वर्षे, धंदा शेती, रा.देवधानुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व त्याचे इतर २ फरार
साथिदारांसह केल्याचे निष्पन्न झालेले असून त्यावरून अजय शेडे, शिवाजी गरड व ऋषीकेश किरतिके यांना गुन्हयाचेकामी अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी अजय शेंडे याचेकडून रू.
१० लाख रोख रक्कम व गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.
नमुद गुन्हयातील आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचेकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले
आहेत.
१) कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेचे दि. १६/०१/२०२२ रोजी पहाटे ए.टी.एम.चोरी करण्याचा प्रयत्न केलेबाबत दाखल असणारा दौंड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ३३/२०२२, भा.दं.वि.कलम ३७९,५११ हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
२) वाशीम येथील घरफोडी चोरी करून १,८४,०००/- किंमतीचे १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरून नेलेबाबत
दाखल असणारा वाशिम शहर पो.स्टे.गु.रजि.नं. १४४१/२०२१, भादंवि कलम ४५४,४५७,३८० हा गुन्हा
उघडकीस आणला आहे.
३) गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून रू. ७,६७,०००/- रोख रक्कम चोरीबाबत
दाखल असणारा गु.रजि. नं. १६९/२१, भा.दं.वि.कलम ४६७,३८०,४२७ हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
४) यवत व कुरकुंभ पो.स्टे. हहीत गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटार सायकल ही लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे आरोपी सांगत असून त्याबाबत तपास चालु आहे.

अजय शेंडे हा सहजपुर मध्ये राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्याचेकडे ऋषीकेश किर्तीके हा कामासाठी येत होता तेथे त्यांची तेथे भेट झाली त्यांनतर शिवाजी गरड यानेही अजय शेंडे याचेशी कामासाठी
ओळख केली होती. फरार साथिदार, शिवाजी गरड व अजय शेंडे यांनी पैसे कमाविण्याकरीता घरफोडी करण्याचा
व ए.टी.एम.चोरी करण्याचा प्लॅन तयार केला त्यानुसार अजय शेंडे याने युट्युबवरून घरफोडी, ए.टी.एम.चोरी कशी करावी याची माहीती गोळा केली त्याकरीता लागणारे साहित्य ऑनलाईन मागवून घेतले.
उघडकीस आलेल्या गुन्हयाव्यतरिक्त पकडलेल्या टोळीवर ३ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी इतर गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्याबाबत पोलीस निरीक्षक श्री, अशोक शेळके व पोलीस
निरीक्षक श्री. नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. संजय नागरगोजे हे तपास करीत
आहेत.