पुणे : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापुर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर- लोणीकाळभोर – वडकी – उंड्री कात्रज मार्गावरील तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल धोकादायक झाला आहे. त्यामुळे यापुढे येथे अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी. वाहने सोडून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्ग म्हणुन शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.