Rajesh Tope Big Announcement in Daund – अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त वैशालीताई नागवडे यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते यवत येथे “कोरोना योद्ध्यांचा” ‛सन्मान’, राजेश टोपे यांची दौंडसाठी मोठी घोषणा



|सहकारनामा|

दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या माध्यमातून कोरोना काळात उत्कृष्ठ पद्धतीने आपले कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कोरोना योद्ध्या आशा सेविका, डॉक्टर्स आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यवत येथील गणेश हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब व प्रमोद काका काकडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत  दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा वैशाली ताई नागवडे वीरधवल बाबा जगदाळे, आप्पासाहेब पवार यांनी केले.



कार्यक्रमाची सुरुवात वैशालीताई नागवडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केली. यावेळी वैशालीताई नागवडे यांनी बोलताना कोरोना काळात आशा वर्कर्सचे आणि इतर कोरोना योद्ध्यांचे मोठे योगदान या तालुक्याला लाभले असल्याचे सांगत त्यामुळे त्यांचा सन्मान आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणे गरजेचे होते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी आमच्या  प्रतिभा फाउंडेशनच्या  विनंतीला मान देऊन अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त यवतमध्ये येऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे हि तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.

वैशालीताई नागवडे यांनी यावेळी आशा वर्कर यांच्यासाठी मागणी करताना सर्व आशा वर्कर यांचा विमा कुटुंबासह शासनाने मोफत काढावा तसेच दौंडमध्ये असलेले दौंड रेल्वे, एसआरपीएफ आणि पोलीस ट्रेनिंग सेंटर असे एकूण असलेले 26 हजार अतिरिक्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय पाहता दौंडला झुकते माप देऊन  जास्त प्रमाणात वॅक्सिन (लस) मिळावी अशी महत्वाची मागणी केली.

यावेळी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी बोलताना

जे गेल्या दिडवर्षात समाजासाठी झटले त्यांचा हा सन्मान होतोय याचा अभिमान वाटत असल्याचे सांगत आमदार लंके यांच्या कोविड सेंटरला भेट दिली त्यावेळी तेथील एका रुग्णाने आपली व्यथा सांगताना आपल्या घरातील मंडळीही आपल्याजवळ आली नाहीत मात्र कोरोना योद्धे मात्र ठामपणे पाठीशी उभे राहिल्याने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा तितका थोडा असल्याचे सांगत पत्रकार आणि आशा वर्कर यांचे योगदानही वाखाणण्याजोगे असल्याचे मत व्यक्त केले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 

यावेळी त्यांनी दौंडसाठी मोठी घोषणा केली ती या खालील व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे…


VIDEO – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची दौंडसाठी मोठी घोषणा


पुढे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अजितदादा हे वेळ, आणि शिस्तीचे काटेकोर पालन करणारे नेतृत्व आहे. त्यांनी कोरोना काळात प्रत्येक निर्णय हा खूपच दूरदृष्टीने घेतला. म्युकर मायकोसिसचा फैलाव होऊ लागतात त्यांनी याबाबत तातडीने माहिती मागवून त्वरित फंड उपलब्ध करून दिला त्यामुळे येणाऱ्या संकटाला तोंड देऊन त्यावर मात करण्यास मदत झाल्याचे सांगितले.

तसेच कोरोना काळात मास्क,सिटी स्कॅन, प्लाझ्मा च्या वाढलेल्या किंमती त्वरित खाली आणल्याचे सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी  महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजनेंतर्गत सर्वांना दीड लाख रुपये पर्यंत मोफत उपचार करण्याचा तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे धडकेबाज निर्णय घेतले त्यामुळे आपण या बिकट परिस्थितून चांगल्या प्रकारे सावरलो असल्याचे आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दौंड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास खळदकर यांनी केले. 

या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश आप्पा थोरात, वैशालीताई नागवडे, आप्पासाहेब पवार, जिल्हापरिषद सदस्य वीरधवल जगदाळे, जिप सदस्या राणीताई शेळके, कुंडलिक नाना खुटवड, सुशांत दरेकर, सदानंद दोरगे, गणेश कदम, सारीकाताई पानसरे, निशाताई शेंडगे, सयाजी ताकवणे, हेमलताताई फडके, मा.सभापती झुंबर अप्पा गायकवाड, उपसभापती नितीन दोरगे, अनिल नागवडे हे उपस्थित होते.



या कार्यक्रमामध्ये ‛सहकारनामा’ चे संपादक अब्बास शेख यांचा ‛कोरोना योद्धा’ म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.